होम>insulin degludec
Insulin Degludec
Insulin Degludec बद्दल माहिती
Insulin Degludec कसे कार्य करतो
Insulin Degludec हे दीर्घकाळ क्रिया करणारे इन्श्युलिन आहे, हे इंजेक्शननंतर 24 कार्यरत असते. हे शरीराद्वारे निर्माण केल्या जाणा-या इन्शुलिनप्रमाणेच काम करते. इन्श्युलिन स्नायुंमध्ये व फॅट सेलमध्ये ग्लुकोजच्या पुन्हा वापराची सुविधा देते आणि ते लिव्हरमधून ग्लुकोज मुक्त होण्यावर प्रतिबंध आणते.
Common side effects of Insulin Degludec
रक्तातील साखरेची पातळी लक्षणीय प्रमाणात घटणे, इंजेक्शनच्याजागी त्वचेवर अलर्जी येणे
Insulin Degludec साठी उपलब्ध औषध
TresibaNovo Nordisk India Pvt Ltd
₹1 to ₹19422 variant(s)
Insulin Degludec साठी तज्ञ सल्ला
- इन्सुलिन डिग्लुडेक घेणे थांबवा जर तुम्हाला अनुभवाला आली कोणतीही अलर्जिक प्रतिक्रिया जसे इंजेक्शनच्या जागी लालसरपणा, सूज, पुरळ आणि खाज, त्वचेवर पुरळ, खाज किंवा फोड, छाती चोंदणे किंवा श्वसनास अवघड जाणे, चेहरा, ओठ, जीभ किंवा शरीराच्या इतर भागांची सूज .
- तुम्हाला हायपोग्लायसेमियाची कोणतीही लक्षणे दिसल्यास (जसे की थंडीत घाम; थंड फिकट त्वचा, डोकेदुखी, जलद हृदयगती, आजारी वाटणे, अतिशय भूक लागणे, दृष्टिमधील तात्पुरता बदल, गळून जाणे, असामान्य थकवा आणि अशक्तपणा; अस्वस्थता किंवा कंप, चिंता वाटणे, संभ्रमित वाटणे, एकाग्रता करणे अवघड जाणे) असे अनुभवाला आल्यास इन्सुलिन डिग्लुडेक वापरु नका. तुम्ही गर्भवती असाल किंवा गर्भधारणेचे नियोजन करत असाल किंवा स्तनपान करवत असाल तर इन्सुलिन डिग्लुडेक वापरणे टाळा.
- तुम्हाला मूत्रपिंड किंवा यकृताच्या समस्या असल्यास; आजवर तुमच्या मधुमेहामुळे चेतापेशीचे नुकसान झाले असल्या इन्सुलिन डिग्लुडेक वापरु नका.
- इन्सुलिन डिग्लुडेक घेताना मद्यपान करणे टाळा.
- तुम्ही नियमितपणे भोजन घेतले नाही, किंवा तुम्ही भरपूर व्यायाम केला, किंवा तुम्हाला अशक्तपणा किंवा आजारपण वाटत असेल तर इन्सुलिन डिग्लुडेक घेताना विशेष खबरदारी घ्या.
- इन्सुलिन डिग्लुडेक मिश्रणं त्वचेच्या थराखाली इंजेक्ट करायची असतात. ती शिरेत किंवा स्नायूत टोचू नका. इंजेक्शनचा कोन महत्वाचा आहे; इंजेक्शन तंत्र शिकण्यासाठी प्रथम वापरण्यापूर्वी तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या
- इन्सुलिन डिग्लुडेक मिश्रण शिरेतून किंवा स्नायूच्या आत टोचू नये. फांट पंप्समध्ये त्यांचा वापर करु नये.
- इंजेक्शनच्या जागा दंड (डेल्टॉईड), ओटीपोट, नितंब आणि मांडीच्या भागात प्रत्येक इंजेक्शनच्या वेळी बदला, जेणेकरुन इंजेक्शनची प्रत्येक जागा 1 किंवा 2 आठवड्यांमध्ये एकापेक्षा अधिक वेळा वापरली जाणार नाही; इंजेक्शनच्या जागी त्वचेमधील बदल कमी करण्यासाठी असे करावे.
- इन्सुलिन डिग्लुडेक मिश्रण स्वच्छ आणि रंगहीन नसेल किंवा त्यात कण असतील तर ते वापरु नका.
- आवश्यक इन्सुलिनपेक्षा घेतलेली मात्रा अधिक असेल तर हायपोग्लायसेमिया होऊ शकतो. तुमच्या रक्तातील साखरेची पातळी नेहमी नियमितपणे तपासा.
- तुम्हाला हायपोग्लायसेमियाची कोणतीही लक्षणे दिसल्यास (जसे की थंडीत घाम; थंड फिकट त्वचा, डोकेदुखी, जलद हृदयगती, आजारी वाटणे, अतिशय भूक लागणे, दृष्टिमधील तात्पुरता बदल, गळून जाणे, असामान्य थकवा आणि अशक्तपणा; अस्वस्थता किंवा कंप, चिंता वाटणे, संभ्रमित वाटणे, एकाग्रता करणे अवघड जाणे) तुम्ही साखर किंवा कार्बोहायड्रेट्स खाऊन तत्काळ रक्तातील साखर वाढवणे आवश्यक आहे.
- गाडी चालवणे किंवा मशीन हाताळताना खबरदारी घेतली पाहिजे कारण यामुळे लक्ष एकाग्रतेची किंवा प्रतिक्रिया देण्याची तुमची क्षमता तुम्हाला रक्तात कमी साखर असेल किंवा तुमच्या दृष्टिमध्ये समस्या असतील तर कमी होऊ शकते.